आर्णीत मतदार यादीवर 1154 हरकती

-मतदारांची दमछाक : इच्छुकांकडूनही तपासणी -28 आक्टोबरला होणार सुनावणी

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
voter list in arni येथील नगर परिषद प्रारूप मतदार यादींवर शेवटच्या दिवसापर्यंत 1154 हरकती इच्छुक उमेदवार व मतदारांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. शहरातील 11 प्रभागांतून 22 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने पालिका प्रशासनाने 11 प्रभागांच्या मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक मतदारांचे दोन-दोन प्रभागांत नाव असल्याची हरकत घेतल्या गेली आहे, तर काही मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागाऐवजी इतरत्र गेल्याने या सावळ्या गोंधळामुळे सारेच मतदार त्रस्त झाले आहेत.
 
 

वोटर लिस्ट  
 
 
आर्णी नगरपालिकेकडे 17 ऑक्टोबरपर्यंत 1154 हरकती नोंदवण्यात आल्या. मागील सात दिवसांत नोंदवलेल्या हरकतींची तपासणी प्रशासन करीत आहे. यात प्रामुख्याने एकाच व्यक्तीची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणे, प्रभाग सीमेवरील मतदारांना दुसऱ्या प्रभागात टाकणे, रहिवाशांच्या ठिकाणामध्ये तफावत असणे, नावांमध्ये किरकोळ चुका आणि काही परिसरांचा प्रभाग बदलणे अशा स्वरूपाच्या त्रुटींचा समावेश आहे. पडताळणी पारदर्शक व्हावी, यासाठी नगर परिषद प्रशासनाने 11 प्रभागासाठी 11 पथक तयार केले असून त्यामध्ये 1 बिएलओ व त्या सोबत 2 कर्मचारी असे एकूण 33 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सध्या यादीच्या कामात व्यस्त आहेत.voter list in arni 28 आक्टोबरला उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी योग्य हरकती व तक्रारींची सुनावणी आर्णी नगर परिषदेत होईल.
इच्छुक उमेदवारांनीही घेतल्या हरकती
अनेक इच्छुक उमेदवारांकडून आपल्या प्रभागातील मतदार यादीची पडताळणी होत असून अनेक दिवसांपासून आपल्या भागात राहत असलेल्या व्यक्तीची नावे अचानक दुसèया प्रभागात दिसत असल्याने त्यांनाही चिंता सतावत आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील मतदार हा आपल्याच प्रभागात राहावा, यासाठीही इच्छुकांमध्ये प्रयत्न सुरू आहेत.

आर्णी नगर परिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय मतदार याद्यावर 17 ऑक्टोबरपर्यंत 1154 हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींंची पडताळणी व कार्यवाहीसाठी प्रभागनिहाय पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून स्थळ निरीक्षण व चौकशी अहवाल घेण्यात येत आहेत. प्राप्त हरकती निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्यात येत आहे. आवश्यक प्रकरणात प्राधिकृत अधिकारी आशिष शिंघाटे उपजिल्हाधिकारी सामान्य निवडणूक यांच्याद्वारे 28 ऑक्टोबर दरम्यान सुनावणी आयोजित करून आक्षेप निकाली काढण्यात येईल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी तरुणभारतशी बोलताना सांगितले.