अनिल कांबळे
नागपूर,
operation u turn शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी आणि अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी नागपूर पाेलिसांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन यू टर्न’ या उपक्रम सुरु केला. या उपक्रमात आतापर्यंत 83 हजार 924 जणांची झाडाझडती घेण्यात आली असून चक्क 3 हजार 29 मद्यपी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम पडला असून अजुनही हा उपक्रम सुरु आहे.
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून आणि वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांच्या नेतृत्वात गेल्या जुलै पासून ‘ऑपरेशन यू टर्न’ हा उपक्रम राबविणे सुरु केले. मद्य प्राशन करुन रात्रीच्या सुमारास वाहने चालविणाèयांची संख्या वाढली हाेती. परिणामतः रस्ते अपघात आणि अपघातांमध्ये बळींची संख्या वाढली हाेती. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमात मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई हाेत आहे. अल्पवयीन आणि ट्रीपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर,वाहतूक पाेलिसांनी ’ऑपरेशन यू-टर्न’ माेहिमेअंतर्गत दरराेज जवळपास 3 हजार वाहनचालकांची तपासणी केली जात आहे.operation u turn यामुळे अपघात कमी हाेतील आणि लाेकांचे प्राण वाचतील. गत वर्षाच्या तुलनेत 65 अपघाती मृत्यू कमी केले आहेत. सणासुदीच्या काळात बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे ही माेहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
आकडे बाेलतात....
वाहतूक परिमंडळ तपासणी मद्यपींवर कारवाई
- एमआयडीसी 8220 313
- साेनेगाव 14376 370
- सीताबर्डी 19760 318
- अजनी 7267 264
- लकडगंज 1076 297
- सक्करदरा 1300 234
- काॅटन मार्केट 5448 336
- इंदाेरा 1385 265
- कामठी 17759 314
‘ऑपरेशन यू-टर्न’ या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. या कारवाईंमुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे. तसेच मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. हे ऑपरेशन नियमित सुरु असून यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे.
- लाेहित मतानी (पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)