प्रेयसीसह चाैघांवर गुन्हे दाखल : माैजमजा करण्यासाठी चेनस्नॅचिंगचा मार्ग
दिनांक :20-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
thieves gang मित्रांसाेबत माैजमजा आणि पार्टी करण्यासाठी काही युवकांनी टाेळी तयार करुन शहरातील विविध भागातून साेनसाखळी चाेरीचा मार्ग पत्करला. चाेरीच्या पैशातून दारु पार्ट्या आणि हाॅटेलवरील खर्च भागवत हाेते. टाेळीतील एका युवकांने त्यांच्या कृत्यात प्रेयसीलाही सहभागी करुन घेतले. मात्र, काही महिन्यानंतर पाेलिसांनी या टाेळीला अटक केली आणि 2.22 लाखांचे चाेरीचे साेने जप्त केले. वैभव उफर् पिंटू उफर् लकी धनराज बिजेवार (34 वर्षे, रा. रामदास पेठ), अंकित राजेंद्र जयस्वाल ( वय 36, रा. अजयनगर, अंबाझरी), सराा व्यवसायी अतुल माेहन पटेल (23,रामदासपेठ, काचीपुरा) आणि गाैरी (21, ्रेंड्स काॅलनी) अशी चाेरट्यांच्या टाेळीचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वैभव बिजेवार आणि अंकित जयस्वाल यांना प्रेयसींना पार्ट्या आणि ट्रिपवर फिरायला न्यायचे हाेते. त्यामुळे दाेघांनी घरी पैशांची मागणी केली.मात्र, घरुन नकार मिळाल्याने त्यांनी दुचाकीवरुन साेनसाखळी हिसकावण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामध्ये वैभवने आपली प्रेयसी गायत्री हिलाला सहभागी करुन घेतले. धंताेली, इमामवाडा, साेनेगाव, सीताबर्डी परिसरातून ते दुचाकीवरुन महिलांच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावून पळ काढायला लागले.thieves gang ती साेनसाखळी विकून माैजमजा करायला लागले. साेनसाखळी चाेरी करण्यासाठी त्यांनी टाेळी तयार केली आणि सुसाट दुचाकी चालवून साेनसाखळी करायला लागले. चाेरीचे साेने अतुल पटेल हा विकत घेऊन त्याचे दागिने तयार करीत हाेता.