आर्णी-घाटंजी थेट एसटी बस सुरू करण्याची मागणी

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा आर्णी,
ST bus आर्णीवरून घाटंजीला जाण्यासाठी थेट बस नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने दारव्हा किंवा दिग्रस डेपोने आर्णी ते घांटजी थेट बस सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.आर्णीवरून घाटंजीला जाण्यासाठी थेट एसटी बस नसल्याने घांटजी येथे जाण्यासाठी यवतमाळवरून घांटजीला जावे लागत असल्याने प्रवाशांना जास्तीचा खर्च येत आहे. तसेच जास्तीचा वेळ जातो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडतो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो.
 

ST bus 
कोरोनापूर्वी ST bus आर्णी ते घाटंजी थेट बससेवा सुरू होती. कोरोना काळात बससेवा बंद करण्यात आली. त्यानंतर ही बससेवा सुरूच झाली नाही. यासाठी प्रवाशांनी कित्येक वेळा मौखिक व लेखी स्वरूपात निवेदन दिले. पण अद्यापपर्यंत ही सेवा सुरू झाली नाही.कोरोनापूर्वी दिग्रस डेपोकडून आर्णी ते घाटंजीसाठी दिवसातून 3 फेèया चालत होत्या. आर्णीवरून घाटंजीला जाणाèयाची संख्या मोठी आहे. त्यामुळे दारव्हा डेपोने आर्णी घाटंजी बस सकाळी 10, दुपारी 2 व दुपारी 4 अशा फेèया सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आर्णी घाटंजी थेट बससेवा नसल्यामुळे या मार्गातील नागरिकांना आर्णीवरून तळणी व तेथून घाटंजीला ऑटोने जावे लागते. आर्णी येथे आर्णी व घाटंजीकरिता शासनाने उपविभागीय कार्यालयाला मान्यता दिली आहे. परंतु सुरवातीला यावर घाटंजीच्या नागरिकांनी आक्षेप घेतला, पण त्यानंतर शासनाने मान्यता दिली.
 
 
परंतु थेट बससेवा ST bus नसल्याचेही एक कारण समोर येत आहे. यासाठी विरोध होत आहे. आर्णीवरून तळणीमार्गे घाटंजीचे अंतर 32 किमी होते. आता आर्णी ते यवतमाळ 40 किमी व तेथून घाटंजी 35 किमी असा 75 किमीचा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे.त्यासाठी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होऊन वेळही जास्त जात आहे. यासाठी आमदार, खासदार, जनप्रतिनिधींसह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाèयांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन ही प्रलंबित मागणी पूर्ण करावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.