Auspicious Yoga on Diwali after 71 years या वर्षी २० ऑक्टोबर रोजी साजरी होणारी दिवाळी ७१ वर्षांनंतर विशेष असणार आहे. या दिवशी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग, गुरूच्या उच्च राशीत स्थानामुळे हंस योग, तसेच आदित्य मंगळ योग आणि कलानिधी योग तयार होत असल्याने पाच अत्यंत शुभ संयोग एकाच दिवशी निर्माण होत आहेत. या अद्वितीय ग्रहयोगांमुळे काही राशींना खास लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती घेऊन येणार आहे. त्यांच्या योजनांना गती मिळेल, आर्थिक फायद्याच्या संधी उघडतील आणि नोकरी किंवा व्यवसायात सकारात्मक बदल दिसतील. कार किंवा अन्य मोठ्या खरेदीच्या निर्णयातही योग अनुकूल राहणार आहे.
कर्क राशीच्या लोकांना दिवाळी आणि त्यानंतरचा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल अनुभवता येतील, नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना शुभ बातम्या मिळतील, तसेच पालक आणि जोडीदाराकडून आधार व प्रेम मिळेल. सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी नशिबाची साथ देखील राहणार आहे.
तुळ राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती, समृद्धी आणि आरोग्य सुधारणा या सर्व क्षेत्रात लाभ होणार आहेत. शिक्षण, करिअर आणि प्रेम संबंधांमध्ये शुभ बदल अनुभवता येतील, तसेच वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. या वर्षीच्या दिवाळीने या तीन राशींच्या लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची नवीन पर्वणी सुरु केली आहे.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.