महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात बालाजीचे भव्य महाधाम पूर्ण होणार!

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
गुजरात,
Balaji Mahadham हीरा व सिल्क सिटी म्हणून ओळखले जाणारे सुरत आता एका नव्या धार्मिक ओळखीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील पलसाणा चौकडीच्या सान्निध्यात २९.२५ बीघा म्हणजेच सुमारे ५८,००० चौरस गज क्षेत्रफळावर भगवान महाकालेश्वर आणि सालासर बालाजींचे भव्य महाधाम उभारले जाणार असून, याचे भूमिपूजन १ मार्च २०२६ रोजी संत-महंतांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
 
 

Balaji Mahadham 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी श्री महाकालेश्वर सालासर हनुमान ट्रस्टतर्फे व्यापक तयारी सुरू असून, सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चात हे दिव्य मंदिर उभे राहणार आहे. ट्रस्टचे संस्थापक सत्यनारायण गोयल आणि कोषाध्यक्ष रवी कापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे महाधाम २८ एप्रिल २०२९ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
भूमिपूजन समारंभासाठी संपूर्ण देशातून प्रतिष्ठित संत, महंत, समाजसेवी, उद्योजक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती अपेक्षित आहे. उज्जैन येथील महाकाल मंदिराचे मुख्य महंत गुरु प्रदीप शर्मा आणि राजस्थानमधील सालासर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी विशनजी मिठ्ठ जी हेही या दिवशी विशेष रूपात सहभागी होणार आहेत. ट्रस्टचे पदाधिकारी आलोक अग्रवाल आणि राजेंद्र पटवारी यांनी सांगितले की, भूमिपूजनाच्या भव्य आयोजनासाठी गेले अनेक महिने तयारी सुरू आहे.
 
 
 
हे महाधाम केवळ Balaji Mahadham  एक मंदिर न राहता, एक समर्पित आध्यात्मिक केंद्र असेल, जिथे भक्तांसाठी विविध सुविधा असतील. भाविकांसाठी ध्यानधारणा कक्ष, धार्मिक ग्रंथांचे अभ्यास केंद्र, अन्नछत्र, विश्रांतीगृह, तसेच वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सेवा पुरवण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य बगिचे, पवित्र जलकुंड व भक्त निवासांची सोय देखील केली जाणार आहे.सुरत शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा प्रकल्प केवळ गुजरातच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाचा आध्यात्मिक केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या महाधामामुळे सुरतची ओळख केवळ आर्थिक आणि औद्योगिक नव्हे, तर धार्मिकदृष्ट्याही अधिक बळकट होणार आहे.