महाज्योतीच्या माध्यमातून होतकरू स्वप्न साकार करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर,
cm devendra fadnavis महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. याला आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामूळे मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

mahajyoti 
 
 
सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खा. श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे उपस्थित होते.
विविध स्पर्धा यश संपादन
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे.cm devendra fadnavis ओबीसी मुलासाठी ६० पेक्षा जास्त वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे. ओबीसी समाजाच्या कल्याणसाठी शासन तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाज्योती संस्थेच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी झाली आहे. नागपूरच्या भूमीवर आता ‘महाज्योती’ची प्रशासकीय इमारत तयार होणार आहे. हा केवळ वास्तूचा नव्हे तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण असल्याचे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

संशोधनासाठी आदर्श मापदंड ठरेल - मंत्री अतुल सावे
महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीत या इमारतीत समुपदेशन कक्ष, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष आणि २४८ विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय अशा सर्व सुविधांचा असणार आहे. ही वास्तू म्हणजे शिक्षण, संस्कार आणि संशोधनाचा पवित्र संगम राहणार आहे. नाशिक येथे देखील महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री सावे यावेळी म्हणाले.