दफ्तरीच्या कापसाला मिळाला ८१०० रुपये भाव

सैय्यदच्या ‘पुष्पा’ने मारली बाजी

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |

Cotton is priced at
 
 
सिंदीरेल्वे, 
Cotton is priced at Rs. 8100. यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला नुकतीच सुरुवात झाली. सेलू येथील व्यापार्‍याने कापसाला ८१०० रुपये प्रति क्विंटल भाव दिला. खडकी (आमगाव) येथील इरफान अली सैय्यद यांच्या सिंचित दफ्तरी कंपनीच्या पुष्पा जातीच्या कापसाला परवा व्यापार्‍याने चक ८ हजार १०० रुपये दर दिला. सैय्यद यांच्याकडे सात एकर ओलिताची शेती आहे. त्यांना पहिल्या वेच्यात सुमारे २२ क्विंटल कापूस मिळाला. दिवाळीच्या हंगामात आर्थिक तंगी नसताना देखील घरच्याच वाहनातून हा कापूस त्यांनी सेलूच्या बाजारपेठेत नेला. तेथे दफ्तरी बी-बियाणे उत्पादक प्रतिष्ठानातर्फे थेट ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यंदा सोयाबीन पाठोपाठ कपाशीची देखील दैनावस्था झाल्याची सर्वत्र चर्चा असताना हा दर शेतकर्‍यांच्या जखमेवर मलमाचे कार्य करेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यतकरताना दिसले.