मधुबन लेआउटमध्ये स्वरगंधतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Madhuban Layout महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउटच्या प्रांगणात दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. स्वरगंधतर्फे आयोजित कऱण्यात आले होते. कार्यक्रमात अतुल जोशी, राहुल कुळकर्णी, दीपिका लेहगावकर, कल्याणी लांबे, रूपाली देशकर, आणि माया बनसोडे यांनी अप्रतिम गीत सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन मेघा लेहगांवकर यांनी केले. दीपिकाच्या “पाडाला पिकलाय आंबा” या लावणीवर महिलांनी नृत्य केले तर अतुल जोशींच्या “खैके पान बनारस वाला” गीतावर पुरुष मंडळींनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले.
 
Madhuban Layout
 
नगर विकास सोसायटीतील निवृत्त मनपा अभियंता हेडाऊ यांनी गीत सादर केले. मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी साऊंड सिस्टिम आणि खुर्च्या उपलब्ध करून दिल्या. Madhuban Layout टिकेश्वर बिसेन आणि अशोक वेले यांच्या सौजन्याने अल्पपहाराची सोय केली गेली. सर्व सादरीकरणांना श्रोतृवर्गाने उत्स्फूर्त दाद दिली आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र