जिल्ह्यातील सेवा प्रकल्पांना दिवाळी भेट

महसूल विभाग व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Diwali donation drive Yavatmal, यवतमाळ जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने गरजू, वंचित, गोरगरिबांंकरिता सेवाभावी प्रकल्प चालविले जातात. हे सर्व प्रकल्प लोकसहभागातून चालत असल्याने त्यांना दिवाळीनिमित्त सद्भावना भेट द्यावी, असे यवतमाळ महसूल विभाग व काही सामाजिक कार्यकर्त्यांना वाटले. त्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन केल्यानंतर अगदी दोन-तीन दिवसांतच स्वेच्छेने सुमारे 70 हजार रुपये जमा झाले. या पैशातून काही संस्थांना 30 किलो तूरडाळ व 30 किलो तांदूळ कट्टा आणि एक तेलाचा पिपा असे साहित्य देण्यात आले.
 

 Diwali donation drive Yavatmal  
यानिमित्त Diwali donation drive Yavatmal रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या कार्यक्रमास यवतमाळ तहसीलदार डॉ. योगेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. दिवाळी हा महत्त्वाचा व आनंदाचा सण आहे. या सणाचा आनंद अशा प्रकल्पातून निवास करीत असणाèया व शिक्षण घेत असणाèया गोरगरीब वंचितांपर्यंत पोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन सेवा समर्पणचे सचिव अनंत कौलगीकर यांनी केले. याप्रसंगी उमरी पठार वृद्धाश्रमचे अध्यक्ष सुरेश राठी, सेवा समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, नायब तहसीलदार एकनाथ बिजवे, संकल्प फाऊंडेशनचे रवी ठाकूर, ज्योती कॅन्सर व रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे, दीपक बागडी, अमोल मुक्कावार, आनंद कसंबे, श्रीश विवेक कवठेकर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून नंददीप बेघर व मनोरुग्ण केंद्र, तेजस्विनी छात्रावास, संत दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार, सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम आर्णी, संकल्प फाऊंडेशन, ओवी फाउंडेशन, सेवा समर्पण ट्रस्ट, ऊब जाणिवेची संस्था, घाटंजी यांना मदत करण्यात आली. ज्या संस्था येऊ शकल्या नाहीत त्यांना त्या प्रकल्पावर जाऊन ही मदत देण्यात आली. नंददीप बेघर व मनोरुग्ण केंद्राची मदत संदीप शिंदे, नंदिनी शिंदे व नरेंद्र पवार यांनी स्वीकारली.