‘इंसाफ न मिले तो अस्थियां नाली में बहा देना'

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
इटावा,
Etawah Mohit Yadav suicide उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोहित यादव नावाच्या तरुणाने आपल्या पत्नीच्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपले दुःख व्यक्त केले होते. व्हिडिओमध्ये मोहितने सांगितले की, जर मुलांचे संरक्षण करणारा कायदा असता, तर मी कदाचित हे पाऊल उचलले नसते. माझी पत्नी आणि सासरच्या लोकांनी वर्षानुवर्षे माझा मानसिक छळ केला आणि मी आता ते सहन करू शकत नाही. त्याने आपल्या आई-वडिलांना माफ करण्याची विनंती करत म्हटले, जर मला न्याय मिळाला नाही, तर कृपया माझी राख नाल्यात टाका असेही म्हंटले आहे.
 
 

Etawah Mohit Yadav suicide 
 
वृत्तानुसार, मोहित यादव एका सिमेंट कंपनीत फील्ड इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि नोएडामध्ये एकटाच राहत होता. तिथेच त्याची ओळख प्रिया नावाच्या महिलेशी झाली आणि सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी कुटुंबियांच्या संमतीने लग्न केले. मात्र लग्नानंतर प्रियाचे वर्तन बदलू लागले आणि तिने आपल्या कुटुंबापासून वेगळे राहण्याची मागणी केली. मोहितच्या कुटुंबाचा आरोप आहे की प्रिया आणि तिच्या आई-वडिलांनी त्याच्यावर जमीन त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव आणला आणि मानसिक छळ केला. तसेच, व्हिडिओमध्ये मोहितने म्हटले की जर त्याने जमीन त्यांच्या नावावर केली नाही, तर त्यांच्यावर खोटा खटला दाखल केला जाईल, तसेच त्याला मुलाला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. घटनास्थळ जॉली हॉटेलचे खोली क्रमांक १०५ होते, जिथे मोहितने गळफास घेतला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनास्थळी माहिती दिली, आणि पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमनंतर मोहितचा मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.