दोन गांजा विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
वाशीम,
Ganja sellers caught by police गांज्या विक्रीसाठी नेणार्‍या दोन इसमांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून १२ किलो गांजा अंदाजे किंमत १.२० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १९ ऑटोबर रोजी करण्यात आली. याबाबत सविस्तर असे की, पोलिस प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली की, दोन इसम कारंजा येथून मंगरुळनाथकडे गांजा घेऊन येत आहेत. त्यावरुन स्थागुशा पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी त्वरीत दोन पथक तयार करुन कारंजाकडे रवाना केले. त्यातील एक पथक मंगरुळनाथ रोडवरील वाडा फाटा येथे तैनात करुन एक पथक कारंजा - मंगरुळनाथ रोडवर पेट्रोलिस करीत होते. या दरम्यान रात्री १.३० वाजता च्या दरम्यान दोन इसम होन्डा शाईन मोटार सायकलवर मंगरुळनाथकडे जातांना दिसले.
 
 

Ganja sellers caught by police 
 
त्यांचे जवळ असलेल्या बॅग मध्ये काही तरी संशयित इसमाबाबत माहीती देवून त्याचा पाठलाग करीत मंगरुळनाथकडे येत असता यातील संशयीत इसमांना समोर पोलिस असल्यााचे दिसताच ते पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांप प्रसंगावधान राखून त्यांना पकडले व त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा दिसून आला. अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव ज्ञानेश्वर दयाराम मुखमले रा. गोगरी ता. मंगरुळनाथ व कृष्ण उर्फ कुणाल गजानन पुसाडे रा. शेलुबाजार ता. मंगरुळनाथ जि. वाशीम असे सांगीतले. त्यावरुन पोलिसांनी मंगरुळनाथ पोस्टे येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला. सदर कारवाई जिपोअ अनुज तारे यांचे अध्यक्षतेखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर, पोहवा गजानन अवगहे, पोहवा आशिष बिडवे, राहुल व्यवहारे, पोअम भुषण ठाकरे, राजकुमार यादव, शुभम चौधरी, अविनाश वाढे, गोपाल चौधरी, चालक सुनील तायडे व संदिप डाखोरे यांनी परिरम घेतले.