दिवाळीत मुंबईतील घराला भीषण आग!

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
मुंबई,
House fire in Mumbai मुंबईतील कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील एका चाळीत भीषण आग लागली. काही क्षणांत संपूर्ण घर जळून खाक झाले. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली; मात्र, या घटनेत १५ वर्षीय यश विठ्ठल खोतचा मृत्यू झाला, तर ३० वर्षीय देवेंद्र चौधरी, १३ वर्षीय विराज खोत आणि २५ वर्षीय संग्राम कुरणे गंभीर जखमी झाले. देवेंद्रची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, तर इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.
 
 
 
House fire in Mumbai
प्राथमिक तपासात विद्युत वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका पथक घटनास्थळी तात्काळ पोहोचून बचावकार्य करत होते. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे आग पसरण्यापासून रोखण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस आणि अग्निशमन दल आग लागण्याचे नेमके कारण शोधत आहेत.