आरमोरी,
Inauguration of Thanegaon Library तालुक्यातील ठाणेगांव (नविन) येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान, गडचिरोली निधी 2024-25 अंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे रविवारी, 19 ऑक्टोबर रोजी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते फित कून विधिवत लोकार्पण करण्यात आले. या वाचनालयाचे मंजुरी व बांधकाम पूर्णत्वाला आणल्याबद्दल माजी आमदार कृष्णा गजबे यांचे स्थानिक नागरिकांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात माजी आमदार कृष्णा गजबे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदू पेट्टेवार, सामाजिक कार्यकर्ते नंदु नाकतोडे, सरपंच वर्षा मडावी, स्नेहा भांडेकर, मनोज जुवारे, ताराचंद कुनघाडकर, अनिल नैताम, दिनेश जुवारे, गंगाधर कुकडकर, पत्रकार दौलत धोटे, वासुदेव मडलवर, राहुल तितिरमारे, गोपाल भांडेकर, उत्तम पेंदाम (पो. पाटील), महेश किरमे, शैलेंद्र गजभिये, अजय नारनवरे, लालाजी कुकडकर व ग्रामस्थ युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान बुथ प्रमुख शुभम नैताम यांची पूर्वी झालेली गंभीर दुखापत लक्षात घेऊन माजी आमदारांनी त्या परिवाराला भाजपा तालुका आरमोरीच्या वतीने आर्थिक मदत दिली. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाचा अधिकाधिक वापर करून ज्ञान संपादनाचे आवाहन केले व गावासाठी ही सुविधा एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले. या नव्या सार्वजनिक वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि सर्व ग्रामस्थांना ज्ञानाच्या वाढीस मोठा आधार मिळणार आहे, जेणेकरून ठाणेगांव (नविन) गावाचा शैक्षणिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल.