कळमेश्वर नगरीत दिवाळी पहाट उत्साहात साजरी

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Kalmeshwar Nagar कळमेश्वर येथे श्री गुरूदेव सेवा मंडळच्या वतीने दिवाळी पहाट सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन विजयराव नागपूरे व डॉ. महात्मे यांनी केले, तर राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. सचीन काळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम रंगलो.
 
Kalmeshwar Nagar
 
सोहळ्यात निलेश झोड आणि जिवन कला सुसंस्कार कला मंडळातील विद्यार्थी यांनी सुमधूर आवाजात अभंग, भजन, देशभक्ती गीत आणि लोकगीत सादर केले. तसेच विश्वव्यापी गुरूदेव सेवा मंडळच्या वतीने ठोल ताश्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली गेली. Kalmeshwar Nagar कार्यक्रमात स्वच्छता दूतांचा सन्मान करून भेटवस्तू दिल्या गेल्या. कार्यक्रमात मक्कासरे, अरुण रत्नपारखी, अंजली रत्नपारखी, तसेच पाटील, बिरजू रघूवंशी, ईखार साहेब, दटके व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रसन्न वातावरणात हा दिवाळी पहाट सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
  
सौजन्य: अंजली रत्नपारखी, संपर्क मित्र