महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचीहदगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
veerashaiva lingayat sabhas महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी महादेव मठ संस्थान, हदगाव येथे लिंगायत बांधवांची सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ष. ब्र. 108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली होते. प्रमुख उपस्थिती संजय चिंचोळकर व तुकाराम इंद्राळे यांची होती. या सभेत हदगाव तालुक्यातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
 

लिंगायत  
 
 
सर्वानुमते हदगाव तालुकाध्यक्षपदी साईनाथ मारोतराव चंदापुरे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी बालाजी घाळाप्पा, उपाध्यक्षपदी सूर्यकांत माळोदे, सचिवपदी शिवकुमार महाजन, सहसचिवपदी पवन माळोदे आणि कोषाध्यक्षपदी सच्चिदानंद मुळे यांची निवड करण्यात आली. शहर संघटकपदी नंदकिशोर महाजन, तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी शिवम नंदकुमार हनवते, तर सदस्य म्हणून सुभाष आणेराव, सूर्यकांत चिंचोलकर, राजभोज चिंचोलकर व कैलास कल्याणकर यांची निवड करण्यात आली. सर्व कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली तसेच जिल्हा शाखेचे पदाधिकारी संजय चिंचोलकर आणि तुकाराम इंद्राळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी नूतन कार्यकारिणी सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या सभेत महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या वतीने आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याची घोषणा करण्यात आली. हा मेळावा रविवार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक वधू-वरांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरांवर संवाद व सहभाग वाढावा या उद्देशाने लिंगायत सभा प्रत्येक तालुक्यात जाऊन योग्य उमेदवारांची निवड करून सामाजिक एकजूट मजबूत करण्याचे कार्य करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निवड झालेल्या हदगाव तालुका कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष शी राजेंद्रजी हुरणे, कार्याध्यक्ष जयचंद्र तत्तापुरे, सरचिटणीस राजन मिसाळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश मारकोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजया साखरे, संजय चिंचोलकर व जिल्हा कार्यकारिणीतील अन्य सदस्यांनी अभिनंदन करून नव्या कार्यकारिणीस यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.