मुंबई.
Nitesh Rane attacked शनिवारवाडा परिसरातील नमाज प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला, तर परिसरात गोमूत्र शिंपडल्याचेही सांगितले जाते. पोलिसांनी हे सर्व थांबवले, त्यामुळे मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये वादही झाला. या प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी मोठा हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का? त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर हाजी अली येथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन हनुमान चालीसा म्हणाले तर ते मान्य होईल का? असा सवाल केला आहे.

राणे म्हणाले की शनिवारवाडा हिंदू समाजाचे प्रतीकात्मक धार्मिक स्थळ आहे आणि तिथे नमाज करण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यास, देशातील इतर धार्मिक स्थळांवर न्याय समान असावा. त्यांनी नमाजसाठी जागा कमी असल्याचा प्रश्न उपस्थित केला आणि हिंदू संघटनांनी उठवलेला आवाज योग्य असल्याचे म्हटले. तसेच, नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधान उद्धृत केले की, राज्यात सध्या ९६ लाख खोटे मतदारांची नावे मतदार यादीत आहेत, आणि निवडणुका यादी पूर्ण स्वच्छ न झाल्यास होऊ नयेत.
राणे म्हणाले की, लोकसभेतील मतदानानंतरही कोणतीही तक्रार समोर आली नाही आणि आता व्होट चोरीचे आरोप उठवल्याचे टीकास्त्र त्यांनी वापरले. त्यांनी हे देखील म्हटले की, लोकसभेत ज्या पद्धतीने मतदान झाले आणि हिरवे झेंडे फडकवले गेले, त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही; परंतु आता महाराष्ट्रात हिंदू समाजाने भगव्या गुलालाने प्रतिक्रिया दिली असल्यामुळे व्होट चोरीचे आरोप उचलले जात आहेत. राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत, त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आणि वर्तमान राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.