नागपूर,
Ravindra Nagar छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने रवींद्र नगरच्या रहिवाश्यांनी बालगोपाल मंडळीला किल्ला साकारण्याची प्रेरणा दिली. त्या अनुषंगाने यंदा वसाहतीत प्रतापगड किल्ला साकारण्यात आला.
हा कार्यक्रम दरवर्षी नरक चतुर्थीला रवींद्र नगर वसाहतीतील नागरिकांच्या दिवाळी मिलनाच्या सोहळ्याशी संबंधित असून, यंदा हे बारावे वर्षे आहे. बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. Ravindra Nagar कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालगोपाल मंडळीने अहोरात्र मेहनत घेतली.