नागपूर,
rang-de-nagpur-competition महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ’रंग दे नागपूर’ या भव्य भित्तिचित्र स्पर्धेला नागपूरसह राज्याच्या इतर भागातील चित्रकारांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. दोन दिवसांत शहराच्या भिंतींवर साकारलेल्या या कलाकृती साकारणार्या कलावंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खा. श्यामकुमार बर्वे, आमदार परिणय फुले, आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार मोहन मते, संजय मेश्राम, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, मनपाचे आयुक्त तथा अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., सुकेशनी तेलगोटे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर, डॉ.गजेंद्र महल्ले, अभिजीत मौंदेकर आदी उपस्थित होते.
’स्वच्छ व स्मार्ट नागपूर’च्या स्वप्नांचे दर्शन
मनपाच्या ७५ गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील ’स्वच्छ व स्मार्ट नागपूर’च्या स्वप्नांचे दर्शन कलेच्या माध्यमातून घडविणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत १८ वर्षांवरील विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन गटांत सहभाग घेण्यात आला. एकूण ११८ गटांनी प्रवेशिका भरल्या होत्या, त्यापैकी मनपाने दिलेल्या संकल्पनेनुसार ९२ गटांच्या प्रवेशिका पात्र ठरल्या. rang-de-nagpur-competition प्रत्येक गटात ३ ५ चित्रकार होते, ज्यामुळे एकाचवेळी जवळपास तीनशेहून अधिक चित्रकारांनी नागपुरातील या रंगोत्सवात सहभाग नोंदवला.
मनपाच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक
चित्रकारांनी दीक्षाभूमीजवळील सुंदरलाल राय मार्ग येथे, तर हौशी तसेच व्यावसायिक चित्रकारांनी सीताबर्डीतील फ्रिडम पार्क येथील भिंतीवर आपली कला नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालय, नटराज आर्ट अँड कल्चर कॉलेज, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात प्रमुख सहभाग घेतला. rang-de-nagpur-competition मनपाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.