दुसर्‍यांचे हित जोपासणारे तत्त्व म्हणजे हिंदुत्व : शेंडे

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
देवळी, 
rashtriya-swayamsevak-sangh भारत हे मूलतः हिंदु राष्ट्रच आहे. त्यासाठी कोणत्याही औपचारिक घोषणेची नाही तर आपल्या जन्मभूमीला मातृभूमी मानणार्‍या राष्ट्रभक्तांची सत्य सनातन हिंदुत्वाचा एक दक्ष प्रतिनिधी म्हणून आचरण करण्याची आवश्यकता आहे. स्वतः आधी दुसर्‍यांच्या सुख दुःखाचे हिताचे या सकल सृष्टीच्या कल्याणाचे चिंतन तत्त्व म्हणजे हिंदुत्व आणि या सार्वभौमक उदारमतवादी तत्त्वांचा अवलंब करीत आचरण करीत जगणारा प्रत्येक जण म्हणजे हिंदू असे विचार भारतीय विचार मंचचे प्रांतीय सदस्य अतुल शेंडे यांनी व्यत केले.
 
 
rashtriya-swayamsevak-sangh
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवळी तालुकातील आंबोरा मंडल येथील विजयादशमी उत्सवात प्रमुख वते म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी सुभाष शेंद्रे होते तर देवळी तालुका संघचालक किशोर फुटाणे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. rashtriya-swayamsevak-sangh ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झालेला संघ स्वतंत्रता चीर काळापर्यंत अबाधित कशी राहील या दिशेने नागरिकांच्या अंगी राष्ट्रीय चरित्राचे मूल्य रुजविन्याचा विजयी संकल्प करत आपल्या शतकीय प्रवासात वाटचाल करत आहे आणि हे केवळ येथील बहुसंख्यक हिंदू समाजाच्या सक्रिय सहभागामुळेच शय होत असल्याचेही शेंडे म्हणाले. कार्यक्रमाला स्वयंसेवक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.