नोव्हेंबर अखेर रस्ते होणार गुळगुळीत

*३५८ किमी रस्त्यांच्या दुरूस्तीला मिळाली मंजुरी

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news यावर्षी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात वेळोवेळी पूरपरिस्थिती ओढावली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध मार्गांची चाळण झाली. याच रस्त्यांच्या दुरुस्तीला शासन स्तरावरून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यातील तब्बल ३८५ किमीचे रस्ते गुळगुळीत करण्याचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.
 
 
 
wardha-news
 
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली. यादरम्यान पूरपरिस्थिती ओढावून जिल्ह्यातील २० पूल क्षतिग्रस्त झाले. शिवाय सुमारे ३०० किमीहून अधिक रस्त्यांची चाळणी झाली. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने क्षतिग्रस्त रस्ते व पुलाची तात्पूर्ती दुरुस्ती करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. पण, ३८५ किमीच्या क्षतिग्रस्त रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी मंजुरी आणि निधीची गरज असल्याने तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया करून जिल्ह्यातील ३८५ किमीचे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध विकास कामांच्या देयकापोटी प्राप्त १७ कोटींचा निधी कामे पूर्णत्वास नेणार्‍या कंत्राटदारांना वितरित करण्यात आला आहे. निधी वितरणाची प्रक्रिया दिवाळीपूर्वीच करण्यात आली आहे. wardha-news जिल्ह्यातील ३८५ किमीचे क्षतिग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हेही काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सा. बा. विभागाचा मानस आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांनी दिली.
१७ कोटींचा निधी मिळाला
सा. बां. विभागाच्या वतीने विविध विकास कामे पुर्णत्वास नेली जातात. यात प्रामुख्याने ५०५४-०३ व ५०५४-०४ या हेड अंतर्गत पुर्णत्वास जाणार्‍या कामांचा समावेश असतो. wardha-news याच दोन हेडला वर्धा सा. बां. विभागाला तब्बल १७ कोटींचा निधी प्राप्त झाला. निधी प्राप्त होताच सा. बां. विभागाने हा निधी दिवाळीपूर्वी विविध विकास कामे पुर्णत्वास नेणार्‍या छोट्या-मोठ्या कंत्राटदारांना वितरितही केला आहे. दिवाळीपूर्वी कमी-अधिक प्रमाणात देयक मिळाल्याने कंत्राटदारांनाही आधार मिळाला आहे.