शास्त्रानुसार लक्ष्मी पूजनाचे सर्व मुहूर्त मंगळवारी

ज्याेतिषाचार्य डाॅ.अनिल वैद्य यांची माहिती

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर,
lakshmi puja 20 ऑक्टाेबरला चतुर्दशी समाप्ती 3 वाजून 44 मिनिटांनी हाेत असून त्यानंतर अमावास्या सुरु हाेणार आहे. त्यामुळे यावर्षी लक्ष्मीपूजन 20 ला करायचे की 21 ऑक्टाेबरला, असा संभ्रम अनेक जण व्यक्त करीत आहे. परंतु शास्त्रानुसार लक्ष्मीपूजनाचे सर्व मुहूर्त मंगळवार दिनांक 21 ऑक्टाेबर राेजी आहेत. त्यामुळे मंगळवारीच पूजन करावे, असे आंतरराष्ट्रीय ज्याेतिषाचार्य डाॅ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
 

लक्ष्मी पूजन  
 
 
तरुण भारतला खास माहिती देताना ते म्हणाले, शास्त्रानुसार 20 ऑक्टाेबरला प्रदाेष काळात अमावस्येची अधिकव्याप्ती असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टाेबरला मंगळवारी अमावस्या प्रदाेष काळात अल्पकाळ आहे. तरीही त्या सुमारास लक्ष्मीपूजन करावे, असे पुराण ग्रंथात सांगितल्याचे डाॅ. यांनी सांगितले. धर्मसिंधू , पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय, व्रत पर्व विवेक इत्यादी ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दाेन्ही दिवशी प्रदाेष काळात अमावस्येची कमी अधिक व्याप्ती असल्यास दुसèया दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्र सांगत असल्याची माहिती डाॅ. वैद्य यांनी दिली. प्रदाेष काळात अमावस्येची कमी व्याप्ती असताना त्यादिवशी सायंकाळी व प्रदाेषकाळी अमावस्या मिळत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करावे असा सुद्धा उल्लेख पुराण ग्रंथात आढळताे. युग्मास् महत्त्व द्यावे, असे वचन असल्याने या सर्व वचनांची संगती लावून पंचांग कर्त्यांनी 21 ऑक्टाेबर 2025 राेजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिले असल्याचे त्यानी सांगितले. आहे.
या दिवशी रात्री 08 ते 09.30 वाजेपर्यंत लाभ वेळा व रात्री 11 ते 12.50 शुभ वेळा आहे.lakshmi puja वृषभ या स्थिर लग्नाची वेळ सायंकाळी 7.17 ते 9.16 वाजेपर्यंत आहे . यापैकी कोणत्याही काळात लक्ष्मीपूजन केले असता लक्ष्मी स्थिर राहून भरभराट होते असं शास्त्रात सांगितलेले आहे , असे डॉ. अनिल वैद्य यांनी प्रामुख्याने सांगितलेले आहे.
यापूर्वी 28 ऑक्टोबर 1962 , 17 ऑक्टोबर 1963 , 02 नोव्हेंबर 2013 आणि मागच्याच वर्षी म्हणजे 01 नोव्हेंबर 2024 रोजी याप्रमाणेच अमावस्या प्रदोषात अल्पकाळ असताना अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन ज्योतिषांनी सांगितलेले होते. वरील उल्लेखित ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णय यांचा विचार करून 21 ऑक्टोबर 2025 ला मंगळवारी लक्ष्मीपूजन करणे हे शास्त्रसंमत आहे असेही डॉ. वैद्य यांनी तरुण भारतला सांगितले.