देवळी,
ramdas-tadas प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे भांडार आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहिले. त्यांच्या मेहनत आणि त्यागामुळेच आज आपण एक सुखी आणि समृद्ध समाज म्हणून उभे आहोत. त्यांनी योग्य-अयोग्य काय आहे, हे शिकवले. चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून दिली आणि जीवनातील प्रत्येक समस्येवर मात करण्याची प्रेरणा दिली. ज्येष्ठ नागरिक केवळ कुटुंबाचाच भाग नसतात तर ते समाजाचे मार्गदर्शक असतात. देवळीतील जनतेने मला देवळी ते दिल्लीपर्यंत नेले. माझ्या राजकीय प्रवासात खंबीरपणे उभे राहीले. माझ्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
देवळी येथे आयोजित दिवाळी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शोभा तडस, डॉ. नरेंद्र मदनकर, नंदू वैद्य, शरद आदमने, रवी कारोटकर, उमेश कामडी, शुभांगी कुर्जेकर, विद्या झिलपे, दिलीप कारोटकर, विजय गोमासे, मारोतराव मेघरे आदींची उपस्थिती होती. ramdas-tadas तडस पुढे म्हणाले की, ज्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली, ज्या ज्येष्ठांनी समाजासाठी विशेष योगदान दिले आहे, अशांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता शासनाच्या विविध योजना असून त्या आपण त्यांना मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी शहरातील ३०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आल. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शुभांगी कुर्जेकर, संचालन रवी कारोटकर यांनी केले. तर आभार उमेश कामडी यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय मुजबैले, अमोल काकडे, दिलीप खाडे, आसिफ शेख, योगेश आदमने, स्वप्नील बुट्टे, विनोद भगत, अरुण कामडी, विक्रम वैद्य, निखिल कावळे, विनोद तेलरांधे, रमेश सातपुते, वसंत धोटे, दीपक कामडी, आदींनी सहकार्य केले.