इस्लामाबाद,
Shahid Afridi is angry पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा तणावपूर्ण होण्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसून आला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी पाकिस्तान कर्णधार शाहिद आफ्रिदीने अफगाणिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. आफ्रिदी म्हणाले की, “पाकिस्तानने केलेले उपकार अफगाणिस्तान विसरले आहेत.

गेल्या ५०-६० वर्षांपासून आम्ही त्यांची काळजी घेतली आहे. मी कराचीमध्ये ३५० अफगाण कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. शेजारी आणि मुस्लिम राष्ट्र म्हणून दोन्ही देशांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, हेच आमचे मत राहिले आहे. शाहिद आफ्रिदीने पुढे म्हटले की, “हे दुर्दैवी आहे की थेट चर्चा करण्याऐवजी तुम्ही अशा लोकांशी हातमिळवणी केली, जे पाकिस्तानमध्ये बराच काळ दहशतवादात गुंतले आहेत. आम्ही नेहमीच तुमचे स्वागत केले, आश्रय दिला आणि काम-व्यवसायाची संधी दिली. पण आता तुम्ही त्याच लोकांशी हातमिळवणी करत आहात, जे आमच्या देशात दहशत माजवत आहेत.
अफगाणिस्तानने तिरंगी मालिकेतून माघार घेतल्यानंतर, झिम्बाब्वे या मालिकेत सहभागी होणार आहे, अशी घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १८ ऑक्टोबर रोजी केली. ही मालिका १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळली जाणार होती. या घटनेने पाकिस्तान-आफगाणिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर गंभीर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर शाहिद आफ्रिदीने अफगाणिस्तानच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.