फ्नॉम पेन्ह,
sound of ghosts screaming जगात काही असे ठिकाणे आहेत जिथे रात्रीच्या अंधारात आवाज ऐकून लोक भयभीत होतात, आणि त्यात सीमेवरची परिस्थिती अधिक गंभीर बनते. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर अशीच घटना घडत आहे, जिथे रात्री झुडुपांतून ऐकू येणारे कर्कश, असह्य किंकाळ्या आणि रडण्यासारखे आवाज नागरिकांमध्ये आणि सैनिकांमध्ये भीती पसरवत आहेत. स्थानिक लोक आणि सीमावर्ती जवान या गूढ वातावरणामुळे रात्री घाबरलेले असतात त्यामुळ झोप न येणे, मानसिक ताण आणि रक्तदाब वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.
स्थानिक अहवालांनुसार, या आवाजांमध्ये भटक्या आत्म्यांचे शोकाकुल आवाज, रडण्यासारखी किंकाळी आणि कधीकधी विमान इंजिनासारखी गर्जना ऐकू येते. सैनिक आणि नागरिकांचा दावा आहे की हे आवाज रेकॉर्डिंगमधून प्रसारित केले जातात, जे कधी मानवी स्वरासारखे वाटतात. कंबोडियाचे माजी पंतप्रधान व सध्याचे सिनेट अध्यक्ष हुन सेन यांनी याबाबत फेसबुकवर लिहिले की ही फक्त साधी खोड नाही, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आणि मानसिक युद्धाचे उदाहरण आहे. त्यांनी सांगितले की सीमावर्ती भागात या भुताटकीच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती, चिंता आणि मानसिक ताण निर्माण होत आहे. ११ ऑक्टोबर रोजी कंबोडियन मानवाधिकार आयोगाने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्ताला पत्राद्वारे या समस्येची माहिती दिली आहे.
थायलंड-कंबोडिया सीमेवरील या गूढ आणि भयानक परिस्थितीमुळे नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. स्थानिकांचा असा दावा आहे की या आवाजांनी फक्त मानसिक ताण निर्माण केला नाही, तर सीमावर्ती भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे. ही घटना केवळ सीमावाद नाही, तर मानसिक युद्ध आणि मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे तज्ज्ञ सांगतात.