देवळी नपतर्फे महिला बचतगटांचा अभ्यास दौरा

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
देवळी, 
study-tour-of-womens देवळी नगर परिषद मार्फत शहरातील विविध महिला बचत गटातील ३८ महिलांचा कवठा झोपडी येथील बचत गटामार्फत संचालित तेजस्वी सोलर पॅनल कंपनी येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
 
 
study-tour-of-womens
 
शहरातील बचत गटांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता व उद्योगाची कास धरावी. नवीन उद्योग व्यवसाय करण्याकरिता प्रेरणा मिळावी या उद्देशाने इतर ठिकाणच्या उद्योगी बचत गटांना भेटी देणे आवश्यक असते. त्यानुसार नगर परिषद देवळीच्या मुख्याधिकारी नेहा आकोडे यांच्या मार्गदर्शनात या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. study-tour-of-womens दौर्‍यामध्ये बचत गटाच्या महिला सोलर पॅनल कशा पद्धतीने तयार करतात, त्याचे प्रात्यक्षिक व सोलर उद्योग बचत गटाद्वारे कसे उभारावे, याविषयी तेजस्वी सोलर पॅनल कंपनीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आज सोलर का गरजेचे आहे व दिवसेंदिवस सोलर पॅनलची वाढती मागणी याविषयी महिलांना अवगत करण्यात आले.