स्वर मोहिनी ग्रुपचा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Swar Mohini Group यशवंतराव चव्हाण सेंटर, नागपूर येथे श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था, हिंगणा आणि स्वरनाद संगीतकला अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वर मोहिनी ग्रुप’चा हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महेश बंग यांनी केले होते. कार्यक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील भावस्पर्शी आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
 
 
Swar Mohini Group
 
स्मृती मुलमुले, श्याम बापटे, राज जी चौधरी आणि आरती बुटी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध केले. अजित भालेराव संचाने उत्कृष्ट साथ संगत दिली. Swar Mohini Group प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी आयोजक आणि कलाकारांचे कौतुक केले. या यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था, स्वरनाद संगीतकला अकॅडमी आणि ‘स्वर मोहिनी ग्रुप’चे विशेष अभिनंदन करण्यात आले.
सौजन्य: स्मृती मुलमुले, संपर्क मित्र