नागपूर,
pahat nakshatra नवीन सुभेदार ले-आऊट स्थित आलाप संगीत विद्यालय तसेच मार असेट इंट्रा (भाई ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित पहाट नक्षत्रांची’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम धनत्रयाेदशीला सकाळी 6 वाजता सक्करदरा लेक गार्डन येथे संपन्न झाला. या प्रसंगी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद, ब्रिगेडियर सुनील गावपांडे, ग्रुप कॅप्टन सुधिर निभाेरकर, माेतीलाल चाैधरी उपस्थित हाेते.
सीमेवर लढणाèया जवानांसाठी एक दिया सैनिकाेंके नाम’ या संकल्पने अंतर्गत एक हजार श्राेत्यांनी दीप प्रज्वलीत करून सैनिकांना प्राेत्साहित केले. या कार्यक्रमात भुपाळी, भारुड, भक्तिगीत शास्त्रीय बंदिश, अभंग, गजर असा गायनस वादन आणि नृत्याचा भरगच्च कार्यक्रम एकूण 150 विद्यार्थ्यांनी सादर केला. कार्यक्रमाची सुरवात ’उठी उठी गाेपाळा’ या राम भाकरे यांच्या च्या सुरेल प्रस्तूतीने झाली.pahat nakshatra कार्यक्रमाची सकल्पना आलापच्या संचालिका अंजली निसळ यांची हाेती. निशीकांत देशमुख, विशाल दहासहस्त्र, परिमल वाराणशीवार, मनाेज घुसे, मंदार मुढे यांनी वाद्यसंगत केली. कार्यक्रमासाठी राजू धांडे, अजय खडतकर, प्रकाश यादव, मनाेहर सपकाळ, चंदन आगरे यांचे याेगदान लाभले.