हिंगणघाट येथे वर्धा युवा अधिवेशन

*आ. कुणावार यांच्या हस्ते उद्घाटन

    दिनांक :20-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट, 
youth-convention-at-hinganghat वर्धा युथ फेस्ट समितीच्या वतीने एकदिवसीय वर्धा युवा अधिवेशन येथील तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. तरुणाईच्या नेतृत्वगुणांना, लोकशाही मूल्यांना आणि सामाजिक बदल घडवण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणारा हा अनोखा उपक्रम ठरला.
 
 
youth-convention-at-hinganghat
 
या अधिवेशनाचे उद्घाटन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार सागर कांबळे, विद्या विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, ओमकार कुणावार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पूर्वा कोहोड, अनिशा येडे, उदयराज भोंबले, प्रज्वल मिलमिले तसेच श्रेयश इंगोले आदींचा सन्मान करण्यात आला. विजेत्या युवांना हिंगणघाटचे प्रतिनिधी म्हणून वर्धा युथ फेस्ट २०२६ मध्ये होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील लोकसभा अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. वर्धा युथ फेस्टिवल हा जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या हकाचा मंच मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. युवा अधिवेशनाच्या माध्यमातून वर्धा युवा फेस्टिवल समिती नेहमी करत राहील, असे मनोगत वर्धा युथ फेस्टिवल समितीचे अध्यक्ष सारंग रघटाटे यांनी व्यत केले. youth-convention-at-hinganghat संचालन शामसुंदर बाडंबैल तर आभार प्रदर्शन कोमल वर्मा यांनी केले. यशस्वीतेसाठी हर्ष उबाळे, बुलबुल ठाकूर, तनुजा चिचघरे, कृष्णा नांदुरकर, सुशांत जीवतोडे, अक्षय मानकर, हिमांशू नरड, रोहन धोटे आणि इतर युवा सहकार्‍यांनी सहकार्य केले.