पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करून 'ती' बनली IPS अधिकारी

    दिनांक :21-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली
IPS officer Simala Prasad यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक उमेदवार वर्षानुवर्षे परिश्रम घेतात, पण काही असेही असतात जे पहिल्याच प्रयत्नात हे स्वप्न साकार करतात. अशाच यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाची मालक आहे – आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद. २०१० मध्ये तिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत देशभरात ५१वा क्रमांक पटकावला आणि इंडियन पोलिस सर्व्हिसमध्ये (IPS) निवड झाली.
 

IPS officer Simala Prasad 

शिक्षणाची पायाभरणी भोपालमध्ये
८ ऑक्टोबर १९८० रोजी मध्य प्रदेशच्या भोपाल शहरात जन्मलेल्या सिमाला प्रसाद यांना शैक्षणिक आणि साहित्यिक वातावरणात बालपण घालवण्याची संधी मिळाली. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे आयएएस अधिकारी होते आणि नंतर ते भिंडमधून खासदार म्हणूनही निवडून आले. आई मेहरुन्निसा परवेज या प्रसिद्ध लेखिका असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
सिमालांनी सेंट जोसेफ को-एड स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘इन्स्टिट्यूट फॉर एक्सीलेंस इन हायर एज्युकेशन’ मधून बी.कॉम.ची पदवी घेतली. त्यानंतर बरकतुल्लाह विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकही पटकावलं.यूपीएससीपूर्वी सिमाला प्रसाद यांनी MPPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मध्य प्रदेश पोलिस दलात उपअधीक्षक (DSP) म्हणून सेवा केली. त्या दरम्यानच त्यांनी UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण अभ्यासक्रम आधी समजून घेऊन सुस्पष्ट नियोजन करत अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता. अखेर २०१० मध्ये त्यांनी UPSC उत्तीर्ण करत देशभरात ५१ वी रँक मिळवली आणि २०११ बॅचच्या IPS अधिकारी बनल्या.IPS अधिकारी असतानाही सिमाला प्रसाद यांनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले. २०१६ मध्ये त्यांनी झैगम इमाम दिग्दर्शित ‘अलिफ’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २०१९ मध्ये ‘नक्काश’ या चित्रपटातही त्या झळकल्या. त्यांची सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहून अनेकांना वाटते की त्या कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला सहज मागे टाकतील.
 
 
 
सिमाला प्रसाद यांची IPS officer Simala Prasad कथा देशातील लाखो UPSC परीक्षार्थींना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर प्रेरणा देते. शिस्तबद्ध अभ्यास, नियोजनबद्ध मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या स्वप्नांना साकार केले. एक महिला अधिकारी, समाजशास्त्रज्ञ, आणि कलाकार म्हणून त्यांचे बहुआयामी योगदान उल्लेखनीय आहे.आजच्या घडीला, सिमाला प्रसाद केवळ एका यशस्वी आयपीएस अधिकारी म्हणून नव्हे, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात — ज्यांच्या कथेने अनेक तरुणांना स्वतःचा मार्ग शोधण्याची उमेद दिली आहे.