मुंबई,
Actor Rishabh Tandon passes away गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन यांचे २१ ऑक्टोबर रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुःखद बातमी पापाराझी विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यांच्या अचानक निधनाने संगीत आणि चित्रपट उद्योगाला मोठा धक्का बसला असून चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहते आणि मित्र त्यांच्या आठवणी शेअर करून ऋषभला श्रद्धांजली वाहत आहेत.
ऋषभ टंडन हे मुंबईतील गायक, संगीतकार आणि अभिनेता होते. त्यांच्या अभिनयाची ओळख “फकीर - लिव्हिंग लिमिटलेस” आणि “रुष्ना: द रे ऑफ लाईट” या चित्रपटांमधूनही होती. त्यांच्या गाण्यांमध्ये “ये आशिकी,” “चांद तू,” “धू धू कर के” आणि “फकीर की झुबानी” यांचा समावेश आहे. त्यांनी संगीतावर आपले गाढ प्रेम व्यक्त केले आणि त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. ऋषभ टंडनचे अनेक गाणी अद्याप रिलीज झालेले नाहीत, त्यामुळे त्यांचे काम अपूर्ण राहिले आहे.