मुंबई,
abhang tukaram movie इतिहासातील अजरामर व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारणं ही अभिनेता आणि दिग्दर्शकांसाठी नेहमीच एक मोठी जबाबदारी असते. हीच परंपरा पुढे नेत अभिनेता अजिंक्य राऊत आता एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेतून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'अभंग तुकाराम' या आगामी मराठी चित्रपटात तो तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
छोट्या पडद्यावर आपल्या विविध भूमिका गाजवणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अजिंक्य राऊतसाठी ही भूमिका एक मोठं पाऊल मानलं जात आहे. 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून तो प्रथमच ऐतिहासिक भूमिकेत झळकणार असून, या भूमिकेबाबत त्याने व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहेत.
"छत्रपती शिवाजी abhang tukaram movie महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. त्यांच्या भूमिकेसाठी निवड होणं हे माझ्यासाठी भाग्याचं आणि अभिमानास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना केवळ अभिनय पुरेसा नाही, तर जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने संपूर्ण टीमने मला उत्तम सहकार्य केलं," असं अजिंक्यने सांगितलं.‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अभंग, त्यातील अध्यात्मिक सार आणि जीवनदृष्टी प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी वाणीच्या माध्यमातून समाजाला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवलं. हेच तत्त्वज्ञान चित्रपटाच्या माध्यमातून आधुनिक काळातही तितक्याच प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा abhang tukaram movie आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांनी लिहिले आहेत. पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे यांचे असून, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांनी केलं आहे. रंगभूषेसाठी अतुल मस्के, तर वेशभूषेसाठी सौरभ कांबळे यांचे योगदान आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी केलं असून, साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे यांनी केलं असून, कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज आणि संजय करोले यांचं आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील एक नव्या वाटेवरचा प्रवास ठरू शकणाऱ्या ‘अभंग तुकाराम’मधून संतांच्या अभंगांमधील गूढतेचा आणि शिवरायांच्या धैर्याचाही संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इतिहास, अध्यात्म आणि कलेचा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक ७ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत.