अॅडलेड,
All eyes on Rohit-Kohli भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मबाबत विश्वासार्ह विधान केले आहे. मागील सामन्यात रोहित ८ धावांवर बाद झाला, तर कोहली आपले खाते उघडू शकला नाही. या कामगिरीमुळे सोशल मीडियावर दोघांवर टीका झाली होती.
पत्रकार परिषदेत कोटक म्हणाले, मला असं वाटत नाही की दोघेही खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये चांगली तयारी केली होती. पहिल्या सामन्यात अपयश हवामानामुळे आले. सामना अनेक वेळा थांबवला गेला, त्यामुळे खेळाडूंना जुळवून घेणे सोपे नव्हते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हलवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सुरू होईल, तर टॉस सकाळी ८:३० वाजता होईल.
प्रशिक्षकांनी स्पष्ट केले की दोघेही अनुभवी फलंदाज आहेत आणि त्यांच्यावर गरज नसतानाही हस्तक्षेप करणे योग्य नाही. त्यांनी पुढे सांगितले, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यांनी नेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि माझ्या मते ते योग्य तयारीत आहेत.