भारताला अजूनही मिळाली नाही ट्रॉफी; आता BCCI काढणार नक्वीची हेकडी

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
bcci-tcomplaint-against-naqvi-with-icc आशिया कप २०२५ जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन निघून जाण्यामुळे भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. नंतर ती ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात ठेवण्यात आली.
 
bcci-tcomplaint-against-naqvi-with-icc
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआय संपूर्ण प्रकरण उपस्थित करणार आहे. bcci-tcomplaint-against-naqvi-with-icc एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "एसीसी अध्यक्ष अजूनही ठाम आहेत, त्यामुळे ट्रॉफी हस्तांतरणाबाबत त्यांचे उत्तर आम्ही स्वीकारणार नाही." बीसीसीआयने मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल पाठवून ट्रॉफी लवकरात लवकर भारताला सोपवण्यास सांगितले, मात्र नक्वी यांनी हट्टीपणा कायम ठेवला आहे. एसीसी प्रमुख म्हणाले की, "ट्रॉफी दुबई कार्यालयातून घेता येते; बीसीसीआयचा अधिकारी किंवा खेळाडू तिथे येऊन ट्रॉफी घ्यावी लागेल."
आयसीसीच्या बैठकीत हा वाद कसा सुटतो हे आता पाहणे मनोरंजक ठरेल. bcci-tcomplaint-against-naqvi-with-icc तथापि, भारतीय संघाने सलग तीन सामन्यांत पाकिस्तानला पराभूत करून जिंकलेली ट्रॉफी न मिळणे पूर्णपणे अन्याय्य ठरत आहे. २०२५ च्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने पहिले गट टप्प्यात पाकिस्तानला सात विकेट्सने हरवले, सुपर फोर सामन्यात सहा विकेट्सने विजय मिळवला, आणि अंतिम सामन्यात पाच विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. जेतेपद मिळाल्यानंतर भारतीय संघ मैदानावर बराच वेळ प्रतीक्षेत राहिला. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) उपाध्यक्ष ट्रॉफी सादर करण्यासाठी आले होते, परंतु मोहसिन नक्वी यांनी नकार दिला. या प्रकरणामुळे भारतीय संघ आणि बीसीसीआयच्या धैर्याची कसोटा आता आयसीसीच्या पुढील बैठकीत पाहायला मिळेल.