वर्धेत शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी ‘काळी दिवाळी’

महाविकास आघाडीचे सरकाविरुद्ध धरणे आंदोलन

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
वर्धा,
black diwali अतिवृष्टीमुळे यंदा शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन, कापूस उत्पादकांचा तोंडचा घास अतिवृष्टी, चारकोल रॉट व यलो मोझॅक रोगांनी हिरावून घेतला. मात्र, सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली नाही. सोबतच जाहीर अनुदान तुटपुंजे असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने २१ रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘काळी दिवाळी’ साजरी करून धरणे दिले. या आंदोलनाद्वारे शेतकरी व कष्टकर्‍यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
 

black diwali  
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अमर काळे यांनी केले. यावेळी माजी आमदार रणजित कांबळे, उबाठाचे नेते अशोक शिंदे, राकाँ शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेस नेते शेखर शेंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. अभ्युदय मेघे, सुधीर पांगूळ यांनी मनोगत व्यत करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली.
अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. दिवाळीपर्यंत नुकसान भरपाईचे पॅकेज देण्याचे जाहीर केले, पण अद्याप शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अद्यापही शेतकर्‍यांची कर्जमाफी केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी किती असंवेदनशील आहेत, हे स्पष्ट होत असल्याची टीका खा. काळे यांनी केली.
 
 
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, ओल्या दुष्काळाच्या पॅकेजमध्ये वाढ करावी, वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, वन्यजीवांकडून होणार्‍या पिकांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ करावी, शेतकर्‍यांना सोलर पंपाची सती न करता सोलर व वीजजोडणी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे, शासकीय कामांची प्रलंबित देयके कंत्राटदारांना तातडीने अदा करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
च्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, काँग्रेसचे राजेंद्र शर्मा, प्रवीण हिवरे, बालू वानखेडे, दशरथ ठाकरे, अतुल पन्नासे, अर्चना भोमले, डॉ. बाळकृष्ण माऊस्कर, रवी शेंडे, वीणा दाते, बाळा नांदुरकर, मुन्ना झाडे, महेश झोटिंग, राजाभाऊ पांगूळ, इक्राम हुसैन, किरण ठाकरे, निहाल पांडे, सलिम कुरेशी, संदीप किटे, रिपाइंचे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर, सुरेश ठाकरे, अरुणा धोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.