अनिल कांबळे
नागपूर,
Boyfriend commits triple murder प्रेमसंबंधाला प्रेयसीच्या भावासह स्वतःचे वडिल विराेध करीत असल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिहेरी हत्यकांड घडवले. या हत्याकांडात सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती. या शिक्षेला आराेपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र, न्यायालयाने त्या आराेपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्या. उर्मिला जाेशी-ाळके आणि न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली. मनाेजसिंग पंजाबसिंग भाडा असे आराेपीचे नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बाेरगाव येथे 23 जानेवारी 2015 राेजी आराेपी मनाेजसिंग भाडा (31) याचे शेजारी राहणाèया वडिलाच्या मित्राची मुलगी अंजुरा हिच्याशी प्रेमसंबंध हाेते. दाेघेही एकमेकांना आवडत हाेते.
त्यामुळे त्यांनी प्रेमविवाह करण्याच निर्णय घेतला हाेता. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधाला अंजुराचा भाऊ गाेपाल याचा विराेध हाेता. त्याने बहिणीची समजूत घातली आणि मनाेजपासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे मनाेज चिडला. गाेपालने मनाेजचे वडिल पंजाबसिंह भाडा यांच्याशी चर्चा केली. लग्नास विराेध असल्याचे सांगून मुलगा मनाेजला समजून सांगण्यास सांगितले. दाेघांनीही मनाेजला प्रेमविवाह करण्यास परवानगी दिली नाही. दाेघांच्या विराेधानंतर प्रेयसी अंजुरानेही लग्न करण्यास नकार दिला. यानंतर अंजुरासाेबतच्या प्रेम संबंधामुळे आराेपीचा वडिलांशी सतत वाद हाेत असे. वडिलांनी वारंवार समज देऊनही आराेपीने तिच्याशी असलेले नातं ताेडण्यास नकार देत हाेता.
घडले तिहेरी हत्याकांड
स्वतःचे वडिल आणि भावाच्या विराेधामुळे लग्न हाेणार नाही, असे निश्चित झाल्यामुळे संतप्त मनाेजने रागाच्या भरात आराेपीने वडिलांवर गाेळी झाडून खून केला. त्यानंतर अंजुराच्या घरी गेल्यानंतर तिच्या तिचा चाकूने भाेसकून खून केला. तिला वाचविण्यासाठी आलेला भाऊ गाेपाल याच्याही पाेटात चाकून खूपसून खून केला. िफर्यादी राजेश भाडा यांनी बेनाेडा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, बंदुकीचे गाेळे, चाकू आणि आराेपीचे कपडे जप्त केले. तपासात आराेपीच्या कपड्यांवर आणि शस्त्रावर पीडितांचे रक्त आढळले.
सत्र न्यायालयाचा आदेश कायम
अमरावती सत्र न्यायालयाने 16 मे 2019 राेजी मनाेजसिंग भाडा याला कलम 302 (खून) अंतर्गत दाेषी ठरवून जन्मठेपाची शिक्षा तसेच कलम 499 अंतर्गत 10 वर्षे कठाेर कारावासाची शिक्षा ठाेठावली हाेती. या शिक्षेविराेधात आराेपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे सुसंगत पुरावे, वैद्यकीय साक्ष आणि जप्त केलेल्या शस्त्रांवरील रक्ताचे नमुने या सर्वांच्या आधारे आराेपीचा दाेष सिद्ध ठरवत अपील ेटाळले.
.......