अनिल कांबळे
नागपूर,
Cyber criminals looted सणासुदीच्या दिवसांत सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले असून त्यांनी ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि बांधकाम व्यवसायात पैसा गुंतवल्यास ना मिळविण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडलेल्या दाेघांकडून 35 लाखांहून अधिक रक्कम घशात घातली. गिटीखदान येथील प्रदीप ुलदास महंत (50) रा. नटराज साेसायटी, काटाेल राेड यांना टेलिग्राम नावाच्या समाजमाध्यमावर दाेन गट चालवणाèया ठगबाजाने बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट ना मिळेल, असे आमिष दाखवले. त्याला बळी पडलेल्या प्रदीप यांनी 11 लाखांची गुंतवणूक केली. मात्र कुठलाही परतावा मिळत नसल्याने प्रदीप महंत यांनी केलेल्या तक्रारीवरून सायबर पाेलिसांनी अंजली करबंदा वर गुन्हा दाखल केला.
ज्येष्ठाला 24 लाखांचा गंडा
शेअर बाजारात गुंतवणूकीतून दुप्पट ना मिळेल, या आमिषाला बळी पडून 75 वर्षीय वृद्धान 24 लाख 50 हजार रुपये गमावले. अंबाझरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. रामनगर येथील बाजीप्रभू नगर येथील रहिवासी 75 वर्षीय तक्रारदार ेसबुक या समाजमाध्यमावर काही तरी शाेधत हाेते. त्याच वेळी जाहिरात त्यांना दिसली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त ना मिळवता येताे, याची माहिती हाेती. त्याचा माेह झाल्याने ज्येष्ठाने 24 लाख 45 हजार रुपये गुंतवूनही ना मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.