मुंबई,
Deepika-Ranveer daughter's face बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अखेर त्यांच्या लाडक्या मुलीचा चेहरा जगासमोर आणला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आपल्या छोट्या परीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि हे फोटो क्षणातच व्हायरल झाले.
दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच मोहक छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये ‘दुआ’ लाल रंगाच्या पारंपारिक पोशाखात, दोन वेण्यांमध्ये आणि कपाळावर छोट्या बिंदीसह अत्यंत गोंडस दिसत आहे. छायाचित्रांमध्ये दीपिका पदुकोणने सुद्धा पारंपरिक लाल पोशाख परिधान केला आहे.तर रणवीर सिंग ऑफ-व्हाईट शेरवानीत घातलेलि आहे. दोघेही आपल्या मुलीला हातात घेऊन प्रेमाने कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे.