नागपूर,
Diwali pahat program अपंग महिला बाल विकास केंद्राच्या ‘आशादीप दिव्य गुंजन’ समूहाने नाईक नेलको सोसायटी येथे दिवाळी पहाट कार्यक्रम सादर केला. गणेश वंदनेनंतर भूपाळी, भजन, कव्वाली, आणि मराठी-हिंदी सुमधुर गीतांनी वातावरण भारावले. सर्व गायक आणि वादक दिव्यांग असून त्यांनी आपल्या सुरांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन वीणा मोहाडीकर यांनी केले. आयोजक डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी कलाकारांचे कौतुक केले. शेवटी “आम्ही पुढे पुढे जाणार” या निर्धार गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: अनंत नाईक, संपर्क मित्र