वर्धा,
Drivers targeted in Wardha शहरातील बुटीबोरी–तुळजापूर महामार्गावर जुनापानी परिसरात मंगळवारच्या रात्री २५० ते ३०० टपोरी युवकांनी एकत्र येऊन अक्षरशः भररस्त्यावर दहशत माजवली. या टोळीने वाहनचालकांना टार्गेट करत रस्त्यावरच फटाके फोडले, त्यामुळे अनेक वाहनचालक घाबरून थांबले, काहींनी मात्र प्रसंगावधान राखत काही चालकांनी प्रसंग टाळण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख मार्गावर अशी घटना घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपा सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे दहशत निर्माण करणे हे फक्त कायद्याचे उल्लंघन नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वर्धेत गेल्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला होता. गेल्या काही दिवसात शहरात दारू ढोसून वाहन चालवणाऱ्या वर ही कारवाई केल्याने शहरात कायम धुडगूस घालणाऱ्यांनी आपला मोर्चा जुनापानी चौकात वळवला की काय असा प्रश्न उपस्थित होतो. पण, रामनगर पोलिसांना हा गोंधळाची कल्पना नव्हती काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.