आणि त्याच्यावर चालल्या धडाधड गोळ्या...भयानक व्हिडीओ

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
गयाजी,
Horrific video of the murder बिहारमधील गयाजीमध्ये मतदानाच्या अगोदरच दिवसाढवळ्या झालेली हत्येची घटना परिसरातील निवडणुकीचे वातावरण तापवणारी ठरली आहे. १९ वर्षीय सुभाष पासवानला त्याच्या घराबाहेर तीन गुन्हेगारांनी पिस्तूल दाखवून छातीत गोळी झाडून ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी सहजपणे पळून गेले.
 

Horrific video of the murder
 
जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला असून, त्यात पाच गुन्हेगार सुभाषकडे येत असल्याचे, त्याला थांबवताना दोन्ही पक्षांमध्ये वाद घडत असल्याचे आणि नंतर एक गुन्हेगार छातीत गोळी झाडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या गुन्हेगाराने देखील दुसरी गोळी झाडल्यामुळे सुभाषचा तात्काळ मृत्यू झाला.
 
 

 
या धाडसी घटनेमुळे परिसरात भयाचे वातावरण पसरले आहे. मृताचे वडील उपेंद्र पासवान यांनी या हत्येबद्दल गंभीर आरोप केले आहेत. उपेंद्र पासवान भाजप एससी/एसटी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष असून, त्यांनी विद्यमान महापौर गणेश पासवान यांच्यावर निवडणुकीतील शत्रुत्वामुळे गुन्हेगारांना कंत्राट देऊन त्यांच्या मुलाची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.