सैनिकांच्या गौरवार्थ नागपूरमध्ये दिवा लावण्याचा उपक्रम

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Amar Jawan Memorial माजी वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान), नागपूरच्या आवाहनानुसार नागरिकांनी सीमेवरील सैनिकांच्या नावे दिवाळीत एक दिवा लावावा, अशी मनोभावनेने विनंती करण्यात आली होती. आपल्या घरच्या अंगणात तिरंग्याची रांगोळी काढून मधोमध एक दिवा ठेवावा आणि खाली “सैनिका तुझ्यासाठी” लिहावे, असे संघटनेने सांगितले.
 

np
 
या उपक्रमाचा प्रत्यक्ष कार्यक्रम अमर जवान स्मारक, अजनी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी सैनिकांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येकाने एक दिवा लावला. कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, महिला वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Amar Jawan Memorial त्यानंतर स्वरमेवा टीम ने “एक शाम बलिदानियोंके नाम” कार्यक्रमाद्वारे सुमधुर गीतांची मेजवानी रसिकांनसाठी सादर केली. या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आदर आणि कृतज्ञता जागृत झाली.

सौजन्य: अजय गाढगे, संपर्क मित्र