नागपूर,
Nagpur ST buses दिवाळीच्या दिवसांत गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग असते. यामध्ये विविध प्रवासी साधनांचा उपयाेग केला जात असला तरी एसटी महांमंडळाच्या बसेसला आजही विशेष पसंती मिळत असल्याचे दिसते. प्रवाशांची वाढणारी संख्या बघता नागपुरातील गणेशपेठ आगारातून दाेन आठवड्यांसाठी वाढीव बसेसचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा आजही एसटीवर अधिकचा भराेसा असल्याचे दिसते.
विभागीय अधिकारी श्रीकांत गभने यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशपेठ आगाराजवळ 413 बसेस आहेत. तसेच इलेक्टिकवर चालणाèया 47 बसेसही आहेत. नियमित या आगारातून 1 ते सव्वा लाख लाेक प्रवास करतात तर दिवाळीला हा आकडा दीड ते पावनेदाेन लाखावर जाताे. वाढीव संख्या लक्षात घेता नागपूर जिल्ह्यासह चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली, यवतमाळ, अकाेला, अमरावती, भंडारा, गाेंदिया आदी मार्गांवर अधिकच्या बसेसचे नियाेजन केले आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने त्या बसेसमधून हे नियाेजन करण्यात आल्याची माहिती गभने यांनी दिली. विविध आगारांच्या मिळून जवळपास 1200 बसेस गणेशपेठ मधून धावत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवासाला इलेक्ट्रिक बसेसची जाेड
47 इलेक्ट्रिक Nagpur ST buses बसेस गणशेपेठ आगारातून धावतात. यामध्ये 12 मिटरच्या 22 गाड्या असून त्या भंडारा, चंद्रपूर, अकाेला, अमरावती आणि यवतमाळसाठी धावतात. त्याचप्रकारे 9 मिटरच्या लहान बसेस माेदा, सावनेर उमरेड, हिंगणघाट आणि वर्धा या मार्गावर धावत असून या बसेसमुळे दिवाळीत नागरिकांचा प्रवास साेयीचा झाला असल्याचे गभने यांंनी सांगितले.
विविध याेजनांचा लाभ
महिला सन्मान याेजनेंतर्गत महिलांना एसटी बसेसमध्ये तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळत आहे. त्याचप्रकारे 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकिट दरात 50 टक्के सवलत दिली जात आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेंतर्गत माेफत प्रवासाची साेय आहे. दिवाळीत याचा माेठ्या प्रमाणात लाभ घेतला जात असल्याचे गभने यांनी सांगितले. त्याचेेबराेबर आवडेल तेथे प्रवासाचा लाभही या काळात नागरिक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे परतीसाठी अधिकच्या बसेस
पुणे येथे नाेकरीसाठी अनेक जण स्थायिक असून दिवाळीसाठी बहुतेक जण नागपुरात येतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अधिकच्या बसेसची साेय करण्यात आल्याची माहिती गभने यांनी दिली.