नागपूर,
Diwali Padwa संत गजानन महाराज सेवाभावी संस्था, हावरापेठ यांच्या वतीने दिवाळी पाडव्याला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी परिसरातील नेहमीप्रमाणे स्वच्छता करत असतात. अशा बांधवांना संस्था अध्यक्ष मनोहर मोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मिठाई पाकीट देऊन सत्कार करण्यात आला व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नागपूर शहर भाजपा कार्यकारिणी सदस्य मंगेश मोरे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, महिला पोलिस कर्मचारी आकांक्षा जोशी, तसेच गजानन मंडळाचे उपासक पवन लुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राकेश मोरे यांनी केले, तर आभार किरण जोशी यांनी मानले. Diwali Padwa कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश मोरे, संजय जोशी, रजनी मोरे, मोनाली मोरे, प्रिती मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र