तभा वृत्तसेवा
आर्णी,
Prahar Janshakti Party शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळेल असे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु ही मदत शेतकèयांना मिळाली नसल्याने शासनाने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीकरिता मंगळवार, 21 ऑक्टोबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आर्णीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.
जवळपास अडीच तास पाण्याच्या टाकीवर आंदोलन करून तहसीलदार यांना मंडळ अधिकारी संजय सपरवार, परशराम चव्हाण यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. शासनाने झालेल्या अतिवृष्टीने बाधीत शेतकèयांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकèयांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांची ही दिवाळी अतिशय बिकट परिस्थितीत साजरी होत आहे.
दिलेला शब्द Prahar Janshakti Party शासनाने पाळला नसल्यामुळे शासनाने लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आर्णी नगर परिषदेच्या पाणी पुरवठाच्या पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाने तब्बल अडीच तास ‘शोले आंदोलन’ केले. पाण्याच्या टाकीवरून उतरून तहसीलदार यांना मंडळ अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. शोले आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी जाधव, उपतालुका प्रमुख निरंजन राठोड, अतुल इंगळे, महाळुंगी भंडारी सर्कल प्रमुख संतोष पत्रे, तालुका सचिव युवराज जाधव, सहसचिव अंगद राठोड, प्रकाश साकोरे, अनिल खडसे, आकाश वाघाडे, आकाश राठोड, विशाल चव्हाण यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.