केळझर,
siddhi-vinayak-temple-kelzar विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या केळझरच्या श्री सिद्धी विनायक गणपती देवस्थानच्या वतीने आपदग्रस्त शेतकर्यांना सहाय्यता निधी म्हणून दीड लाखाचा धनादेश नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केला. यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

राज्यात झालेल्या अति पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीडित शेतकर्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता मदत निधीला हातभार लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सिद्धी विनायक मंदिराच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीकरिता धनादेश देण्यात आला. siddhi-vinayak-temple-kelzar याप्रसंगी सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव सुभाष तेलरांधे, विश्वस्त अनिल तेलरांधे, गजानन नरड, भाजपाचे अजय वरटकर, पत्रकार भरत घवघवे उपस्थित होते. राज्यात शेतकर्यांचे अतिवृष्टी तथा पिकांवरील रोगांच्या लागणमुळे सोयाबीन तसेच इतरही पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी त्यांचे हात रिकामेच आहेत. श्री सिद्धी विनायक ट्रष्टने घेतलेल्या या सामाजिक बांधीलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.