स्वरानंद म्युजिक अकादमीचा दिवाळी पहाट संगीत सोहळा

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Swaranand Music Academ भारतीय सोसायटी, न्यू मनीष नगर येथे “दिवाळी पहाट” हा संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम स्वरानंद म्युजिक अकादमी प्रस्तुत आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी आणि हिंदी गाण्यांच्या सुरम्य सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक गाण्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद आणि टाळ्यांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे वातावरण संगीत आणि दिवाळीच्या आनंदाने उजळून निघाले.
 
Swaranand Music Academ
 
या प्रसंगी भाजपाचे मान्यवर नेते अविनाश ठाकरे, रितेश गावंडे, रमेश भंडारी, शशिकांत खरात आणि अमित पुजारी उपस्थित होते. विशेष क्षणी अविनाश ठाकरे यांनी स्वतःच्या सुरेल आवाजात गीत सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. Swaranand Music Academ कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन मित्र परिवार यांनी उत्तम पद्धतीने केले. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात पार पडलेला हा सुमधुर संगीत सोहळा रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.
सौजन्य: स्वाती फडणवीस, संपर्क मित्र