स्वरांगिनी २०२५ दिव्य संध्येचा संगीतमय कार्यक्रम

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
नागपूर
Swarangini 2025 ‘स्वरांगिनी २०२१’ तर्फे आयोजित ‘दीप संध्या’ हा भव्य संगीत कार्यक्रम शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सायंटिफिक सभागृहात संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नि:शुल्क आहे. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. रोहिणी कळमकर आणि अनघा घोडखांदे यांनी केली असून, निर्मिती प्रा. पद्मजा सिन्हा यांची आहे. कार्यक्रमाचे निवेदन शुभांगी रायलू करणार आहेत.
 
Swarangini 2025
 
सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके यांच्यासह मंगेश भोयर, पारिजात काळीकर, डॉ. सुधीर कुन्नावार, अभय व्यास, प्रा. पद्मजा सिन्हा, अनघा घोडखांदे, वैशाली पाटील, वैशाली कडबे, प्रीती कुलकर्णी आणि मैथिली टेंभेकर हे गायक कलाकार सहभागी आहेत. वादक कलाकारांमध्ये परिमल जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंकज यादव, महेंद्र वाटुळकर, दीपक कांबळे आणि ऋग्वेद पांडे यांचा समावेश आहे, जे संपूर्ण संगीत संयोजनात उत्कृष्ट साथ देतील. Swarangini 2025 आयोजकांनी रसिकांना बहुसंख्येने उपस्थित राहून दिवाळीच्या या सायंकाळी सुमधुर संगीताचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र