टोरोंटो,
Teji Kahlon shot कॅनडामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक फायरिंगची घटना घडली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी भारतीय गुन्हेगिरी जगातील कुख्यात रोहित गोदारा टोळीने स्विकारली आहे. पोस्टमध्ये त्यांनी काहलोनवर आरोप केला की तो त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आर्थिक मदत करीत होता, त्यांना शस्त्रे पुरवत होता. या प्रकारच्या आरोपांमुळे हा प्रकरण केवळ वैयक्तिक शत्रुत्वापुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यातील गुंतागुंत असल्याचे दिसते.

दरम्यान कॅनडा आता अनेक भारतीय गुन्हेगारी साखळ्यांसाठी आश्रयस्थान ठरत असल्याच्या आरोपांमुळे स्थानिक प्रशासन आणि भारतातील सुरक्षा विभागांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कॅनडातील भारतीय समुदाय आणि स्थानिक कायदा यंत्रणांनी पुढील घटनांविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे; सोशल मिडीयावरील पोस्टचे स्रोत आणि त्यातील दाव्यांच्या सत्यतेची चौकशी केली जात आहे. तसेच गायक तेजी काहलोन यांची प्रकृती व त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.