त्रिशरण चौकातील सिग्नल अज्ञात वाहनाच्या धडकेत उखडला

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
बुलढाणा ,
trisharan chowk signal accident शहरातील चिखली रोडवरील सिग्रलच्या खांबला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल प्रणाली उभारण्यात आली आहे. शहरातील वाहनधारकांना वाहतूक नियमांची शिस्त लागली पाहिजे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी याची उभारणी करण्यात आली आहे. - परंतु असे काही न घडता याच्या विपरीत - घडतांना दिसून येत आहे. अनेक राजकीय पक्षांनी सिग्रल सुरू व्हावे यासाठी निवेदने दिली परंतु कशाचा परिणाम झालेला नाही. बुलढाणा चिखली महामार्गावरील त्रिशरण चौकात एका अज्ञात वाहनाने सिग्नलच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने खांब कोसळला आहे. यामुळे काही त्या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
 

ad